मनमाड(नाशिक) - खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खतांची कमतरता भासू नये, यासाठी शासनाने मनमाडसह नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल ५ लाख ४६ हजार टन खतांचा साठा पाठविला आहे. गेल्या आठवड्यात रेल्वे मालगाडीचे ५ रॅक रासायनिक खते घेऊन मनमाडला दाखल झाले आहे. तेथून हे खत ट्रकमध्ये भरून विक्रेत्याकडे पाठविण्यात आले आहे. मागणीनुसार जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात या खतांचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान मनमाड शहरा सोबत नांदगाव तालुक्यात समाधान कारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा पेरणीच्या कामाला लागला असून सुमारे ७० टक्के पेरणी झाल्याची माहिती ही कृषी विभागाने दिली आहे.
मनमाड तालुक्यासाठी ५ लाख ४६ हजार टन रासायनिक खतांचा पुरवठा - नाशिक खरीप हंगाम
मनमाडसह नांदगाव तालुक्यासाठी कृषी विभागातर्फे खरीप हंगामाचा उद्दिष्ट सुमारे ७० हेक्टर ठेवण्यात आला असून त्यासाठी ४५ हजार ७०९ मेट्रिक टन इतक्या रासायनिक खतांची तर ६८० क्विंटल बी-बियाणाची मागणी नोंदवलेली आहे. या मागणीनुसार रासायनिक खते व बी-बियाणे उपलब्ध झालेली असल्याने शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
५ मालगाडीच्या २१० डब्यातून तब्बल ५ लाख ४६ हजार टन इतके रासायनिक खत नाशिक जिल्ह्यासाठी आले आहे. मनमाडसह नांदगाव तालुक्यासाठी कृषी विभागातर्फे खरीप हंगामाचा उद्दिष्ट सुमारे ७० हेक्टर ठेवण्यात आला असून त्यासाठी ४५ हजार ७०९ मेट्रिक टन इतक्या रासायनिक खतांची तर ६८० क्विंटल बी-बियाणाची मागणी नोंदवलेली आहे. या मागणीनुसार रासायनिक खते व बी-बियाणे उपलब्ध झालेली असल्याने शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांना बांधावर खत आणि बियाणे उपलब्ध -
तालुक्यातील 71 हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे उद्दिष्ट आहे. लॉकडाऊनमुळे सरकारने शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे उपलब्ध करून दिली आहेत. यामार्फत आम्ही जवळपास 3 हजार मेट्रिक टन खत वितरीत केले आहे. यापुढेही शेतकऱ्यांना मागणीनुसार खत व बियाणे उपलब्ध होतील. तसेच कोणी चढ्या भावात विक्री करत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले.