येवला ( नाशिक ) -रोजगारनिर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतावर, शेताच्या बांधावर व पडिक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष व फूलपीक लागवड योजना शासनाने जाहीर केली असून यातून शेतकऱ्यांच्या बांधावर 1 लक्ष गुलाब, मोगरा, सोनचाफासह औषधी व मसाल्याची शेती फुलणार आहे.
शेताच्या बांधावर फुलणार फळ, फुल,औषधी व मसाल्याची शेती... महाराष्ट्र शासनाची योजना...
या योजनेतून पुढील २५ वर्षे दरवर्षी सरासरी एक लक्ष हेक्टर फळझाड, वृक्ष, फूलपीक लागवड होऊन स्वातंत्र्याचे १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा या योजनेंतर्गत एकूण २५ लक्ष हेक्टर लागवड झाली असेल, असे उद्दिष्ट आहे. फुलांचे,मसाल्याचे,तसेच औषधी वनस्पती सारखे असे विविध झाडे लागवड करणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन फुल तसेच सुगंधी औषधे वाढवण्याकरता महाराष्ट्र शासनाने ही योजना अंमलात आणली आहे.
२५ लक्ष हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट - फळबाग क्षेत्र वाढ व्हावी याकरता महाराष्ट्र् शासनाने १९९० पासून राज्यात रोजगार हमी योजनेद्वारे फळबाग लागवड योजना राबविल्याने फळबाग पिकाखाली क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेतून पुढील २५ वर्षे दरवर्षी सरासरी एक लक्ष हेक्टर फळझाड, वृक्ष, फूलपीक लागवड होऊन स्वातंत्र्याचे १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा या योजनेंतर्गत एकूण २५ लक्ष हेक्टर लागवड झाली असेल, असे उद्दिष्ट आहे. फुलांचे,मसाल्याचे,तसेच औषधी वनस्पती सारखे असे विविध झाडे लागवड करणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन फुल तसेच सुगंधी औषधे वाढवण्याकरता महाराष्ट्र शासनाने ही योजना अंमलात आणली आहे.