महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद, दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर शुकशुकाट - नाशिक जिल्हा लेटेस्ट न्यूज

शहरात विकेंड लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशीही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळला असून, सकाळपासून तुरळक नागरिक रस्त्यावर दिसून आले. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही येवलेकरांनी घरीच राहाणे पसंत केले.

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर शुकशुकाट
लॉकडाऊनमुळे रस्त्यावर शुकशुकाट

By

Published : Apr 11, 2021, 10:24 PM IST

येवला -शहरात विकेंड लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशीही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळला असून, सकाळपासून तुरळक नागरिक रस्त्यावर दिसून आले. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही येवलेकरांनी घरीच राहाणे पसंत केले.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून विकेंड लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार येवल्यामध्ये देखील विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला होता. या लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशीही येवलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. लॉकडाऊनदरम्यान जिल्ह्याती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

लॉकडाऊनमुळे रस्त्यावर शुकशुकाट

शहरातील मुख्य रस्ते निर्मनुष्य

विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही येवला शहरात सकाळपासून रस्त्यावर शांतता पहायला मिळाली, शहरातील नेहमी गजबजलेल्या भाजी मार्केट, विंचुर चौफुली, खांबेकर खुंट, शनिपटांगण या सर्वच मुख्य चौकात शुकशुकाट पाहायला मिळाला, रविवार असल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.

हेही वाचा -कोरोनामुळे 'लालपरी' तोट्यात, नऊ हजार कोटींहून अधिक तोटा

ABOUT THE AUTHOR

...view details