नाशिक - पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून सकाळी ९ वाजल्यापासून ११,३५८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड येथील दुतोंड्या मारुती मूर्ती पाण्यात गेली आहे.
गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरी नदीला पूर - नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा गोदावरी नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यासोबतच दारणा धरणातून 19 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर, नांदुर मध्यमेश्वर धरणातून 47 हजार 739 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणातून सोडण्यात आलेले हे पाणी जायकवाडी धरणात जात आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण जरी कमी असले, तरी नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या ह्या पाण्यामुळे मराठवाड्याचा पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.