महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोदावरी नदीला पूर; नाशिककरांच्या संमिश्र प्रतिक्रिया - tryambakeshwar tourist place

मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. आज रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी गोदावरी नदीकाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बच्चे कंपनीला शाळेची सुट्टी मुळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मात्र, जास्त पाऊस येऊ नये. अशी आशाही नागरिक व्यक्त करत आहेत.

गोदावरी नदीला पूर; नाशिककरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

By

Published : Aug 4, 2019, 5:11 PM IST

नाशिक -मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. आज रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी गोदावरी नदीकाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बच्चे कंपनीला शाळेची सुट्टी मुळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मात्र, जास्त पाऊस येऊ नये. अशी आशाही नागरिक व्यक्त करत आहेत.

गोदावरी नदीला पूर; नाशिककरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आसारामबापू पूल, रामसेतू पुल आदी शहरातील पुल पाण्याखाली गेले असून या ठिकाणाहून वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज (रविवारी) सुट्टी असल्याने अनेक नागरिक परिवारासह पूर बघण्यासाठी गर्दी करत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक मार्गावर बॅरेकटिंग करून नागरिकांना पुराच्या पाण्यापासून काही अंतरावर उभा राहायला सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details