प्रतिक्रिया देतानादेवांग जानी अध्यक्ष गोदाप्रेमी समिती, सतीश शुक्ल पुरोहित संघ अध्यक्ष नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने रामकुंड नदीपात्रात कुंभमेळा दरम्यान काँक्रिटीकरण करण्यात आले. या काँक्रिटीकरणामुळे नदीतील नैसर्गिक पाण्याचे झरे बुजले गेल्याचा आरोप अनेकदा गोदाप्रेमींनी केला आहे. तसेच गोदावरी नदीतील प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता दरम्यान लक्ष्मणकुंडांमधील 12 ट्रक गाळ, दगड, वाळू मिश्रित कचरा काढण्यात आला. त्याचप्रमाणे सीताकुंड, रामकुंड, हनुमान कुंड स्वच्छतेचे काम पुढील आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या कुंडाच्या शेवाळलेल्या पायऱ्या घासून स्वच्छ करण्यात येत आहेत. गंगाघाट परिसरात स्वच्छता करून कचरा तात्काळ उचलून घेण्यात आला येत आहे.
म्हणून अस्थींचें विघटन होत नाही :एकीकडे स्वच्छता मोहिमेत कुंड स्वच्छ होत आहे. दुसरीकडे मात्र कुंडात विसर्जन झालेल्या अस्थींचें विघटनच होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. येथील वस्त्रांतर गृहामुळे रामकुंडावर सूर्यप्रकाशात येत नसल्याने या अस्थींचें विसर्जन होत नाही, असे सांगण्यात येते. तर वस्त्रांतर गृह पाडण्याला विविध स्तरातून कायमच विरोध होत असल्याने हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतो. त्यामुळेच अस्थींच्या विघटनाचाही प्रश्न 'जैसे थे' आहे.
कुंडातील काँक्रिटीकरणामुळे घडतो प्रकार :अस्थी विसर्जन करण्यासाठी रामकुंड परिसरात एक वेगळी जागा तयार करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी विसर्जन केल्यास अस्थींचे विघटन होते. त्यामुळे योग्य ठिकाणी अस्थी विसर्जन केले पाहिजे. तसेच रामकुंड परिसरातील काँक्रिटीकरण काढण्यास आमचा विरोध असल्याचा देखील पुरोहित संघाकडून स्पष्ट करण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रात तळ सिमेंट काँक्रीटचा आहे. त्यामुळे या कुंडात रासायनिक प्रक्रिया होत नाही. म्हणून अस्थींचें विघटन होत नाही. इथे कायम अस्थींचा खचृ साचलेला असतो. कुंड स्वच्छतेच्या नावाखाली या अस्थी कचरा डेपोत जातात, ही बाब म्हणजे भाविकांच्या श्रद्धेबाबत खेळ आहे. हे थांबवायचे असेल तर रामकुंडातील क काँक्रीट काढणे गरजेचे आहे, असे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले.
धार्मिक मान्यता :प्रभू रामचंद्र रामचंद्रांनी त्यांचे पिता आणि दशरथ यांच्या अस्थींचें विसर्जन नाशिकच्या गोदावरी नदीत केल्याची मान्यता आहे. तसेच गोदावरी नदीमध्ये अस्थींचें विसर्जन केल्यास मृतात्म्यास शांती मिळते. त्याचा पुनर्जन्म होतो, अशी देखील नागरिकांची मान्यता असल्याने वर्षभरात देशभरातून हजारो भाविक नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीमध्ये अस्थींचें विसर्जन करण्यासाठी येत असतात. नाशिकच्या गोदावरी नदीत आतापर्यंत प्रसिद्ध राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी, कलाकार यांच्या अस्थींचें विसर्जन करण्यात आले आहे.
हेही वाचा : Attack On Pradnya Satav : आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला..धोका असला तरी जनतेची कामे करण्याचा व्यक्त केला निर्धार