नाशिक- विशाल सह्याद्रीच्या ताठ कण्यासारखा महाराष्ट्र मला आज दिसत नाही. मला महाराष्ट्र आज हतबल दिसतो आहे. सरकार वेडेवाकडे वागत आहे आणि आम्ही थंड आहोत. देशाचे संरक्षण करणारे आणि विमाने बनवणारे 'हाल' चे कामगार आज रडत आहे. संवेदनशुन्य लोकांसाठी मला निवडणूक लढावायची नसून मी जिवंत लोकांसाठी आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शहरात आज मनसेची जाहीर सभा झाली. त्या सभेत राज यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
- शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरत आहे.
- कोणी म्हणतो १० रुपयात जेवण तर कुणी ५ रुपयात जेवण देण्याचे म्हणतो आहे.
- महाराष्ट्र भिकेला लागला आहे का ?
- पुण्यात सीट नाही, नाशिकात सीट नाही, चालले घरंगळत
- माणसे आहे की गोट्या, असे म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
- ३७० रद्द केले अभिनंदन, मात्र महाराष्ट्राशी काय संबंध
- किती काश्मिरी पंडित परत गेले हेही सांगा
- महाराष्ट्र बकाल झाला आहे. त्याबद्दल काय ?
- उद्योगधंदे बंद पडत आहे, त्याचे काय ?
- गेल्या ५ वर्षात, महाराष्ट्रात ५ लाख उद्योग बंद झाले
- असे केंद्र सरकार सांगत आहे.
- असलेल्या नौकऱ्या जाता आहे. बेरोजगारांना नौकऱया कोण देणार
- नोटबंदीचा निर्णय चुकला. देश खड्ड्यात गेला.
- ज्यांना नोबेल मिळाले त्या अभिजीत बॅनर्जीनेही सांगितले की, भारताची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
- पीएमसी बँकेतील ठेवीदार रडत आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- मी नाशिकमध्ये ५ वर्षात विकास करून दाखवला
- नाशिकचा पराभव मला जिव्हारी लागला
- काम केल्यानंतर मला नाकारले
- नाशिकात स्मार्ट रोड म्हणून मुख्य रस्ता २ वर्षांपासून खोदून ठेवला आहे.
- रडा, मरा ... काय वाट्टेल ते करा
- तरीही माझं प्रेम कायम
- संधी द्या, चांगले काम करून दाखवीन
- शहर स्मार्ट करणे ही माझी आवड
- लोकांवर बोजा नको म्हणून सीएसआर मध्ये कामे केली
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे