नाशिक - विधी शाखेच्या आणि इतर ऑनलाईन आवेदन पत्राची मुदत वाढवून देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने आज (शनिवारी) लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राबाहेर हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
काही दिवसांपासून राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. यातच पुणे विद्यापीठाकडून विधी शाखेच्या परीक्षा होणार असल्याचा निर्णय देण्यात आला. मात्र, यात ऑनलाईन आवेदन पत्राची मुदत कमी देण्यात आल्याने विधि शाखेचे अनेक विद्यार्थी आवेदनापासून वंचित राहिले आहेत.