नाशिक -नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आधारवाड गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय जया चवर ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. मात्र उपचारादरम्यान चार दिवसानंतर या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आधारवाड गावात आपल्या आजोबांच्या घरी आलेली जया चवर ही चार वर्षीय मुलगी इतर मुलांसोबत शेतातील घराबाहेर खेळत होती. शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक जयावर हल्ला करत तिची मान जबड्यात पकडून तिला फरफटत शेतात घेऊन गेला. जयाचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर बाजूलाच शेतात काम करत असलेल्या मामाने प्रसंगावधन दाखवत तात्काळ बिबट्याच्या दिशेने धाव घेऊन दोनशे मीटर अंतरावर जाऊन बिबट्याच्या जबड्यातून जयाला ओढत आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्याने जयाला सोडून शेतात पळ काढला. या घटनेत जयाच्या मानेला पाठीला गंभीर जखमा झाल्या होत्या.
जयाला प्राथमिक उपचारासाठी घोटीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीसुद्धा तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र चिमुकलीच्या मानेवरील जखमा खोलवर असल्याने तिला झटके येत होते. अशात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आई तू ये ना...