नाशिक - अयोध्येतील खटल्याच्या निकालावर समाधान व्यक्त करत महाराष्ट्रात देखील लवकरच रामराज्य येईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. महाजन यांनी येथील प्राचीन काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात लवकरच 'रामराज्य' येईल - गिरीश महाजन - Girish mahajan in nashik latest news
गिरीश महाजन यांनी येथील प्राचीन काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गिरीश महाजन
महाराष्ट्रात लवकरच 'रामराज्य' येईल -गिरीश महाजन
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नावर महाराष्ट्र देखील लवकरच रामराज्य येणार आहे. मात्र, त्यासाठी थोडी वाट पाहा, असे म्हणत युती आणि त्यातील घडामोडी याविषयी मतप्रदर्शन करणे टाळले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांसाठी चांगला आहे. न्यायालयाने निकालात संतुलन राखले आहे आणि सर्वांनी शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहनही महाजन यांनी यावेळी केले.
हेही वाचा -राम मंदिरासाठी १९९० पासून सुरू आहे दगड कोरण्याचे काम; आराखडाही तयार