महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यासाठी उद्धव ठाकरेंना दिलं नाही राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण; गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं कारण

Girish Mahajan On Uddhav Thackeray : शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हे सरकारच्या दृष्टीनं व्हीव्हीआयपी नसावेत, त्यामुळं त्यांना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण दिलं नाही, असा टोला गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Girish Mahajan On Uddhav Thackeray
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 7:56 AM IST

Updated : Dec 26, 2023, 2:32 PM IST

मंत्री गिरीश महाजन

नाशिक Girish Mahajan On Uddhav Thackeray : "अयोध्येच्या राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनी काय योगदान दिलं, हे सर्वांना माहीत आहे. ज्यावेळी आम्ही कारसेवक म्हणून आंदोलनात होतो, तेव्हा उद्धव ठाकरे घरात बसले होते. आयोध्या राम मंदिर कार्यक्रमासाठी व्हीव्हीआयपी लोकांना आमंत्रित केलं आहे. शासनाला वाटत असेल तुम्ही साधे आमदार आहेत, म्हणून तुम्हाला निमंत्रण आलं नसेल."असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. गिरीश महाजन नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार :"ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. ही सरकारची भूमिका आहे, प्लॅन वगैरे काही नाही. आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार सांगितलं आहे. या आधी आम्ही टिकणारं आरक्षण दिलं होतं. सरकार बदललं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या दुर्लक्षामुळं ते फेटाळलं गेलं. आम्ही परत सांगितलं आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. आम्ही मराठा समाज कसा सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे सिद्ध करणार आहोत. किती क्षेत्रांमध्ये सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे दाखवलं तर त्यांना आपोआप आरक्षण मिळेल" असं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं.

समाजात दुफळी निर्माण होत आहे :"मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार सरकार देणार आहे. मला वाटतं ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्याच्या आधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याशी आम्ही बोललो. त्यात आता आम्हाला जायचं नाही. सध्या राजकारणात खालच्या भाषेत टीका-टिप्पणी चालू आहे. मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, दोन नेत्यांमधील वाद न होता, समाजात दुफळी निर्माण होत आहे. सामाजिक दृष्टीनं देखील हे योग्य नाही. छगन भुजबळ यांना पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी पण आता हे थांबवा अशी विनंती केली आहे. मी ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलांकडं गेलो, त्यांनाही सांगितलं का अगदी हे फुलस्टॉप करा. छगन भुजबळ पुन्हा बोलले आणि कालच्या सभेत पुन्हा शब्दाला शब्द झाला," असं मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. ग्रामविकास विभागातील भरतीसाठी घेतलेलं परीक्षा शुल्क परत करणार, अंबादास दानवे यांच्या मागणीला यश
  2. सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा, काहीही झालं तरी धारावीकरांना घरं देणार; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
  3. ...त्यामुळं ठाकरेंच्या सत्तेचं 'लंका'दहन, ठाकरे सरकार पाडण्यात माझा वाटा - मुख्यमंत्री शिंदे
Last Updated : Dec 26, 2023, 2:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details