नाशिक Girish Mahajan on Maratha Reservation :मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघावा असा आमचा प्रयत्न असून जरांगे पाटीलांनी उपोषण सोडावे अशी माझी त्यांना विनंती आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खराब होत आहे. मराठा आरक्षणावर तात्काळ जीआर काढला तर टिकणार नाही, असं मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय.
आरक्षणाला कायद्याचा आधार असवा : मंत्री गिरीश महाजन म्हणाले, सुरुवातीला जरांगे पाटीलांची मागणी वेगळी होती. मराठवाड्यातील मराठा समाज वेगळा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कुणबी समाज वेगवेगळ्या भागात असून मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखवण्याची ते मागणी करताय. हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही. पहिल्याच दिवशी ते फेटाळलं जाईल. त्यासाठी वेळ दिला पाहिजे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. पुढे ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं बरोबर आहे. सगळेच लोक मागणी करू लागतील. पश्चिम महाराष्ट्रातील लोकही बोलतील, आरक्षण सर्वांनाच पाहिजे. कुणाला नको आहे? कॅबिनेटमध्ये निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे. आजच्या बैठकीत सगळे छोटे मोठे विरोधी पक्ष नेत्याच्या लोकांना बोलावलंय. उदयनराजे, संभाजीराजे यांनादेखील बोलावलंय. सगळा समाज रस्त्यावर उतरला तर राज्याच्या हिताचे होणार नाही असंही मंत्री गिरीश महाजनंनी म्हटलंय.