नाशिक - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला 40 चा आकडा देखील पार करता येणार नाही. तर, युतीला 220 हुन अधिक जागा मिळतील असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील निवडणुकीत महायुतीला अनुकुल असे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूने असून आम्ही मोठ्या बहुमताने निवडून येऊ असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे
महाराष्ट्रात भाजप आणि सेना उमेदवारांसमोर 45 ते 50 ठिकाणी बंडखोरी झाली आहे. अनेक ठिकाणी बंडखोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरत प्रचार करत आहे. मात्र, त्याचा फारसा फरक महायुतीच्या उमेदवारांना पडणार नाही. कमळ आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर जे उमेदवार आहेत तेच आमचे अधिकृत उमेदवार असून, त्यांनाच निवडून देण्याचे आवाहन महाजन यांनी केले आहे.
हेही वाचा - मनसे अन् राष्ट्रवादीचं ठरलं? नाशिकमध्ये चर्चेला उधाण
महायुतीच्या सभेत फक्त नेत्यांकडून कलम 370 बोलले जाते. मात्र, विकासावर बोललं जातं नाही असा आरोप विरोधकांन कडून केला जात आहे. ह्यावर महाजन बोलले कि, कलम 370 रद्द करणे हा मोठा निर्णय होता. देशाची एकता अखंड राहण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. त्याचा आम्हाला अभिमान असून यावर का बोलू नये असा प्रतिसवाल महाजन यांनी विरोधकांना केला. मागील 5 वर्षात महाराष्ट्र्र सरकारने अनेक कामे केली, केंद्रातून योजना आणून त्या चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या. त्याचा परिणाम मागील लोकसभा निवडणुकीत दिसून आला. 303 जागा मिळून आम्हाला मतदारांनी बहुमत दिल असेही महाजन म्हणाले.
हेही वाचा - बंडखोर उमेदवाराच्या पोस्टरवर भाजप नेत्यांचा फोटो, मतदारसंघात चर्चांना उधान
शेतकरी कर्जमाफीसाठी काही निकष होते, त्याप्रमाणे कर्जमाफी झाली आहे. मोठ्या प्रमाणत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेत. अशात सरकारची तिजोरी देखील बघावी लागेल, मोठे कर्जदार बाकी असती. इतरांना बोलायला काय उचलली जीभ आणि बोलले असे म्हणत आदित्य ठाकरे यांना महाजन यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था फार वाईट असून, शरद पवार हे मैदानात उतरले असले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मागील लोकसभेत त्यांना फक्त ४ जागा मिळाल्या होत्या. त्यांच्या परिवारातील लोकचं पडले होते. मतदार यंदादेखील विकास डोळ्यासमोर ठेऊन मतदान करतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - भाजपच्या जागा जास्त असल्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होतील- रामदास आठवले
काँग्रेसची परिस्थिती देखील या निवडणुकीत वाईट आहे. काँग्रेसचे सेनापती फक्त आपआपल्या मतदारसंघात प्रचार करत बसलेत, त्यातील कोणीही सभा घेत नाही. पृथ्वीराज चव्हाण फक्त अधून मधून टीव्हीवर मुलाखती देतांना दिसतात. असे म्हणत महाजन यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला. विनोद तावडे, प्रकाश मेहता, एकनाथ खडसे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली ह्यावर हा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय असल्याचे म्हणत महाजन यांनी यावर बोलणे टाळले.
हेही वाचा - देशभरातील २० हजार एचएएल कर्मचारी बेमुदत संपावर