नाशिक- भाजप-शिवसेना युतीमध्ये 50-50 फॉर्म्युला ठरला नाही, असे म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला. युतीबाबत अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच फॉर्म्युला असेल. बाकी कोणी काय बोलत असतील त्याला काही अर्थ नाही, असे देखील महाजन म्हणाले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेही वाचा -नाशिकच्या लष्करी जवानाचा जामनगर येथे अंगावर वीज पडून मृत्यू
आमच्या युतीच्या बैठकीत मित्र पक्षांच्या जागा वाटपाबाबत मतभेद नाही. त्यानंतर आम्ही सेना-भाजपच्या जागाबाबत चर्चा करू तसेच उत्तर महाराष्ट्रात 100 टक्के जागा निवडून आणू, वाईटात वाईट 4 ते 5 जागा कमी होतील, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला; लासलगाव परिसरातील घटना
राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी निवडून आलो नाही, तर वडिलांचे नाव लावणार नाही, अशी शपथ त्यांनी माझ्यासमोर घेतली आहे. त्यांनी केलेलं विधान हे बालिश असून, सतीश पाटील यांनी आपल्या वडिलांचे नाव वाचवण्याची चिंता करावी, असा टोला देखील महाजन यांनी लगावला.