नाशिक -दिंडोरीत पारंपारिक टोमॅटोच्या पिकाला फाटा देत शेतकऱ्यांनी आल्याची शेती सुरू केली आहे.
दिंडोरीत टोमॅटो पिकाला आले शेतीचा पर्याय; शेतकऱ्यांना मिळाला फायदा
दिंडोरी तालुक्यात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र महामारी दरम्यान टोमॅटो पिकाबाबत अफवा पसरल्या आणि त्याचे भाव पडले. यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला पर्याय शोधला.
दिंडोरी तालुक्यात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र महामारी दरम्यान टोमॅटोचे पीकाबाबत अफवा पसरल्या आणि त्याचे भाव पडले. यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला पर्याय शोधला. सध्या दिंडोरीतील शेतकऱ्यांनी आल्याचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केल्याचे आले उत्पादक दिगंबर कडू यांनी सांगितले. या शेतीत त्यांना फायदा झाला असून टोमॅटो या पारंपारिक पिकाला पर्याय मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात, असे कड म्हणाले.
आल्याचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी दर क्विंटलला सहा हजार रुपयांप्रमाणे एक टन बियाणे विकत आणले. याची किंमत ६० हजार रुपये झाली. याव्यतिरिक्त शेतमजूर, खतं, ठिबक सिंचन आणि अन्य साहित्यासाठी एकूण सव्वा ते दीड लाखांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.