नाशिक - महापालिकेच्या महासभेत विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. गोंधळ बघून महापौर रंजना भानसी यांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पहिल्यांदाच महासभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली आहे.
नाशिक पालिकेच्या सभागृहातील बत्तीगुल; महासभा तहकूब - विद्युत पुरवठा
बराच वेळ वाट बघूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे जनरेटर सुरू करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न झाल्याने विरोधकांचा रोष अधिकच वाढला. अखेर महापौर रंजना भानसी यांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली.
प्रत्येक गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत महासभा घेण्यात येते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी 11 वाजता महासभेचे कामकाज सुरू झाले. मात्र, सुरुवातीपासूनच सभागृहात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नगरसेवक तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना महासभेचे कामकाज करणे जिकरीचे बनले होते. सभागृहातील पंखे बंद असल्याने अनेकांना घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यामुळे सभागृहात थांबणे असह्य झाले होते. बराच वेळ वाट बघूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे जनरेटर सुरू करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न झाल्याने विरोधकांचा रोष अधिकच वाढला. अखेर महापौर रंजना भानसी यांनी एक तासासाठी महासभा तहकूब केली.
स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेकडून करोडो रुपयांचे काम शहरात सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच कामांना मंजुरी देणारी महासभा अंधारात गेल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या तसेच प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.