नाशिक -गंगापूर डॅम परिसरात प्रेमीयुगुलांना तसेच घोटी सिन्नर महामार्ग नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या दोन टोळ्यांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यामध्ये सुनील वाडगे (वय 21), गणेश गुंबाडे (वय 20) राजू भोजया (वय 21) , रोहित कुसमाडे (वय 19), शिवा मोरे (वय 19) या संशियतांना अटक करण्यात आली आहे.
नाशिकच्या गंगापूर डॅम परिसरात प्रेमीयुगुलांना लुटणारी टोळी जेरबंद... - नाशिक गुन्हे वृत्त
गंगापूर डॅम परिसरात प्रेमीयुगुलांना अडणून लूटमार करणाऱ्या दोन टोळ्यांना नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींची चौकशी केली असता, गंगापूर डॅम आणि सुला टॅम परिसरात लूटमार सेल्याची कबुली त्यांनी दिली
नाशिक जिल्ह्यात रस्त्यावरील लुटमरीच्या घटना वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते. यावरून पोलिस निरीक्षक के के पाटील यांनी आंतर जिल्हा गुन्हेगारांचा सध्याचा ठावठिकाणा व त्याची गुन्हे करण्याची पद्धत यावर सविस्तर माहिती घेतली. सिन्नर पोलीस ठाणे व नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला, याच वेळी गोपनीय माहितीनुसार गंगापूर या परिसरात पर्यटकांची लूट करणारे संशयित हे पिंपळगाव गरुडेश्वर शिवारातील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळगाव गरुडेश्वर परिसरात सापळा रचून गणेश गुंबाडे, सुनील वाडगे यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.
चौकशीत गेल्या महिन्यात गंगापूर डॅम व सुला वाइन परिसरात फिरणार्या पर्यटकांना लूटमार केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्या कडून मोबाईल फोन गुन्ह्यात वापरलेला होंडा शाईन मोटरसायकल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. संशयितांकडून जबरी लूटमारीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.