महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस; जिल्ह्यातील सहा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू.. - पालखेड धरण

जिल्ह्यातील दमदार पाण्याने येथील धरणे गच्च भरली असून गंगापूर, दारणा, नांदूर-मधमेश्वर, भावली, पालखेड आणि आळंदी या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धरण

By

Published : Aug 1, 2019, 12:32 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर धरणासह 5 धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

गंगापूर धरण भरले


नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसाने येथील धरणे गच्च भरली आहेत. तर, गंगापूर, दारणा, नांदूर-मधमेश्वर, भावली, पालखेड आणि आळंदी या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सलग चौथ्या दिवशी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील भावली, आळंदी आणि वालदेवी ही तीनही धरणे 100 टक्के भरली असून नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 84 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील एकूण 24 धरणांत 31685 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.


जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 3168 क्युसेस, दारणा धरणातून 13028 क्युसेस, नांदूर-मधमेश्वर धरणातून 37445 क्युसेस, भावली धरणातून 701 क्युसेस, पालखेड धरणातून 751 क्युसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details