महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर सामूहिक बलात्कार, 3 जण अटकेत - police

लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

नाशिक- सामूहिक बलात्कार

By

Published : Jun 14, 2019, 8:50 PM IST

नाशिक -लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.


शहरात चोऱ्या, दरोडे, हत्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. शहरातील ठक्कर बाजार बस स्थानक परिसरात एका 22 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन नराधमांना पोलिसांनी अटक केली असून इरफान उर्फ राजू ,निवृत्ती सोनवणे आणि हेमंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील एक आरोपी वयोवृद्ध असल्याची माहिती आहे.


पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी इरफान लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गेल्या पाच महिन्यांपासून अत्याचार करत आहे. तर निवृत्ती आणि हेमंत यांनी देखील तिच्यावर अत्याचार केले आहेत. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details