नाशिक - नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 6 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना काल रात्री उशिरा घडली. चाकूचा धाक दाखवून हे कू कृत्य करण्यात आले. या प्रकरणात एका मुलीचा सहभाग असल्याचेही पुढे आले आहे. या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
माहिती देताना पोलीस आयुक्त दिपककुमार पांडेय हेही वाचा -अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 402 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
काल सांयकाळच्या सुमारास आरोपींनी एका मुलीच्या मदतीने पीडितेला अरिंगळे मळ्यात एकाच्या घरी बोलवले व तेथे त्यांनी चाकूचा धाक दाखवत पीडित मुलीवर बलात्कार केला. याबाबत मुलीच्या आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी तातडीने संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरा पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह एक मुलगी व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले.
आरोपींना आज दुपारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी सांगितले.
हेही वाचा -मकर संक्रांतीनिमित्त पतंग व आसारी बनवण्याची लगबग