नाशिक :खून करून अपघात झाल्याचा बनाव ( Fake Accident ) रचत पाच संशयितांनी मृत व्यक्तीच्या विम्याचे पैसे लाटल्याचा धक्कादायर प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. तब्बल चार कोटी रुपये विमा पत्नी असल्याचे दाखवत क्लेम ( Friend Murder For 4 Crores Insurance ) केले. या गुन्ह्यात एका महिलेसह पाच संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. यात मुख्य संशयित मंगेश सावकार, रजनी उकेप्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
एकूण घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 सप्टेंबर 2019 रोजी रात्री इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे रस्त्याच्या कडेला झाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. दुचाकी बाजूला पडलेली असल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती अशोक रमेश भालेराव ( वय 46 राहणार देवळाली कॅम्प भगूर रोड) असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाविरोधात 304 (अ ) प्रमाने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. दोन दिवसापूर्वी मयताच्या भावाने या अपघाताबाबत संशय व्यक्त करत सखोल तपास करण्याचे पोलीस यंत्रणेला पत्र दिले होते. पोलीस ठाण्यात येऊन हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगितले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयातून या गुन्ह्याची कागदपत्र मागून घेत तपास सुरू केला. तपासात विम्याचे चार कोटी रुपये रचनी उके या महिलेच्या नावावर जमा झाल्याच समोर आले. यानंतर संशयित महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने मंगेश सावकार याच्यासह पाच संशयितांची नावे सांगितली. पोलिसांनी सावकार याला ताब्यात घेत चौकशी केली असता खून करून अपघात दाखवत विम्याची रक्कम एकमेकांत वाटप केल्याचे त्याने सांगितले.