महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वस्त्र मंत्रालयाच्या पुढाकाराने येवल्यात पैठणी विणकामाचे महिलांना मोफत प्रशिक्षण - पैठणी विणकामाचे महिलांना मोफत प्रशिक्षण

केंद्रीय वस्त्र मंत्रालय अंतर्गत मुंबईतील बुनकर सेवा केंद्र यांच्यावतीने येवल्यातील महिलांना पैठणी विणकाम प्रशिक्षणा देण्यात येत आहे.

Paithani weaving
येवल्यात पैठणी विणकामाचे महिलांना मोफत प्रशिक्षण

By

Published : Feb 25, 2021, 3:00 PM IST

Updated : Feb 25, 2021, 3:23 PM IST

नाशिक(येवला) - केंद्रीय वस्त्र मंत्रालय अंतर्गत बुनकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने पैठणी विणकाम प्रशिक्षणा देण्यात येत आहे. २० महिलांच्या या प्रशिक्षनाला येवल्यात सुरुवात झाली आहे.

महिला विणकाम शिकणार मोफत

येवल्यात पैठणी विणकामाचे महिलांना मोफत प्रशिक्षण

पैठणी महावस्त्र महिलांसाठी देखणा दागिनाच, येथे अनेक पुरुष पारंपारिकरित्या या देखण्या साडीला हातमागावर आकार देण्याचे कसब शिकत आहे. पण अनेक महिलांना इच्छा असूनही शिकण्याला मर्यादा पडतात. मात्र, वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्यामुळे येथील महिला विणकाम शिकणार असून स्वतः विणकर होऊन आत्मनिर्भर होऊ शकणार आहेत.

पैठणी विणकामाचे संपूर्ण प्रशिक्षण

सुमारे पंचेचाळीस दिवसांचा कालावधी या प्रशिक्षणासाठी असणार असून संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. नवतरुण युवक व महिलांना येथील विणकामाची व हातमागाची परिपूर्ण माहिती असलेले प्रशिक्षक शिकविणार असून या कालावधीत पैठणी विणण्याचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करून घेण्याची संधी महिलांना मिळाली आहे.

विणकरांना ओळखपत्र वाटप करणार

येवला शहर परिसरात खासदार भारती पवार यांच्या पाठपुराव्याने आतापर्यंत दोन हजार विणकर बांधवांना केंद्र सरकारचे विणकर ओळखपत्र वाटप केले आहे. येत्या पंधरा दिवसांत आणखी ७०० विणकरांना ओळखपत्र वाटप केले जाईल. सरकार व प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचे बुनकर सेवा केंद्राचे संदिप कुमार यांनी प्रशिक्षार्थींना सांगितले.

Last Updated : Feb 25, 2021, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details