महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यांना कोण आवरणार? नाशिकच्या शिंदे पळसे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांची प्रवाशांना मारहाण - नाशिक रोड पोलिस ठाणे

काही महिन्यांपूर्वीच टोल नाक्यावर टोल नाका कर्मचाऱ्यांनी ट्रक चालकाला कुरापत काढून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर पुन्हा एकदा तृतीयपंथीयांकडून पैसे न दिल्याने प्रवाश्याला मारहाण करण्यात आल्याने वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल आहे. दरम्यान नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेवर आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे पळसे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा राडा

By

Published : Aug 18, 2021, 7:00 AM IST

नाशिक- पैसे मागण्याच्या कारणावरून प्रवासी आणि तृतीयपंथीयांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नाशिकच्या शिंदे पळसे टोल नाका परिसरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येतेय. पैसे मागण्यावरून हा वाद झाला आहे.

नाशिकच्या शिंदे पळसे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा राडा

तब्बल दहा ते पंधरा मिनिटे दाेन्ही गटांत हाणामारी -

टोल नाका परिसरामध्ये प्रवासी आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद होण्याचे अनेक प्रकार आजवर समोर आले आहेत. मात्र पैसे मागण्याच्या कारणावरून नाशिकच्या शिंदे पळसे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांनी राडा घातल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिंदे गाव येथे टोल नाक्यावर गेल्या काही दिवसापासून तृतीयपंथी हे टोल नाक्यावर उभे राहून वाहनाद्वारे येणाऱ्या प्रवाशांकडे पैसे मागत आहेत. प्रवासी जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत गाडी सोडत नाही. परिणामी सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास टोल नाक्यावर सिन्नरवरून नाशिककडे चारचाकी वाहनांमध्ये प्रवासी चालले होते. या प्रवाशांकडे तृतीयपंथीयांनी पैसे मागितले. प्रवाशांनी पैसे दिले, परंतु काही वेळानंतर हे प्रवासी पुन्हा नाशिक रोडवरून सिन्नरकडे चालले होते. टोल नाक्यावर पुन्हा तृतीयपंथीयांनी या प्रवाशाकडे पैसे मागितले. त्यामुळे प्रवासी म्हणाले की ‘आम्ही अगोदर पैसे दिले आहेत’, मात्र आम्हाला पैसे द्यावेच लागेल अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली. त्यामुळे तृतीयपंथी व प्रवासात वाद झाला व त्यानंतर बाचाबाची झाली व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. तब्बल दहा ते पंधरा मिनिटे दाेन्ही गटांत हाणामारी सुरू होती. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -राज ठाकरे नक्की नातू कोणाचे, प्रबोधनकारांचे की पुरंदरेंचे? हर्षल बागलांचा सवाल

वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

काही महिन्यांपूर्वीच याच टोल नाक्यावर टोल नाका कर्मचाऱ्यांनी ट्रक चालकाला कुरापत काढून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर पुन्हा एकदा तृतीयपंथीयांकडून पैसे न दिल्याने प्रवाश्याला मारहाण करण्यात आल्याने वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल आहे. दरम्यान नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेवर आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details