नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यातील जायखेडा व सोमपूर येथे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उपयोगी ठरणाऱ्या होमिओपॅथिक ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधांचे व मास्कचे वाटप करण्यात आले. डॉ. प्रशांत नहिरे सोमपूरकर यांनी आपल्या मूळगावी या गोळ्यांचे मोफत वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली.
नाशिकच्या सोमपूर येथे ग्रामस्थांना मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप
सोमपूर येथील डॉ. प्रशांत नहिरे नाशिक येथे रुग्णसेवा करतात. त्यांनी गावाकडील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी या उद्देशाने आपल्या सोमपूर या मूळगावी हे औषध व मास्क पाठवून ते ग्रामस्थांमध्ये या गोळ्यांचे वाटप केले.
‘अर्सेनिक अल्बम ३०’ हे मूलद्रव्य असून, श्वसनसंस्थेवरील आजारांसाठी होमिओपॅथीमध्ये गुणकारी मानले जाते. या होमिओपॅथिक औषधीमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असल्याने याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापर केला जात आहे. याला पाण्यासोबत ३० वेळा मिश्रण करून सौम्य केले आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष औषधामध्ये मूळ द्रव्याचा अंश शिल्लक नसल्याने याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. शहरातील होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सकडे हे औषध उपलब्ध आहे. कोरोनाला प्रतिबंध करणारा उपाय म्हणून 'अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधाचा फायदा होत असल्याचे केंद्रातील आयुष मंत्रालय, दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.
वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सोमपूर येथील डॉ. प्रशांत नहिरे नाशिक येथे रुग्णसेवा करतात. त्यांनी गावाकडील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी या उद्देशाने आपल्या सोमपूर या मूळगावी हे औषध व मास्क पाठवले. तसेच, आपल्या मातोश्री तथा सोमपुरच्या माजी सरपंच सविता नहिरे, व वडिल सामाजिक कार्यकर्ते पी. ए. नहिरे यांच्या हस्ते स्थानिक ग्रामस्थ, पत्रकार, मित्र परिवारास याचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.