नाशिक - जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना पाडवा अॅग्रो सोल्युशन फर्म या कंपनीने तब्बल अडीच कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, चांदवड या तालुक्यांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कंपनीने शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी केली. मात्र, त्यांना पैसे दिलेच नाहीत.
अ्ॅग्रो सोल्युशन फर्म कंपनीकडून नाशिक येथील द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, त्याबाबत बोलताना शेतकरी सुनील शिंदे '60 ते 65 शेतकऱ्यांची यात फसवणूक'
या शेतकऱ्यांना अॅग्रो कंपनीने जे चेक दिले, ते बाउन्स झाले आहेत. त्यामुळे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाचा एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे आता या पुढच्या पिकांची लागवड कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या अॅग्रो कंपनीने अडीच ते तीन महिने झाले मात्र, शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. आता या सर्व शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. जवळ-जवळ 60 ते 65 शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली आहे.
'कंपनी विरोधात केला गुन्हा दाखल'
या अॅग्रो कंपनीविरोधात संबंधीत शेतकऱ्यांनी येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही. तोपर्यंत अटक केले व्यक्तींना जामीन मिळू नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही कंपनी पाच जण मिळून चालवत होते. ज्या शेतकऱ्यांनी यांच्याकडे द्राक्षे विकले त्या शेतकऱ्यांना पैसे मागीतल्यावर हे लोक उडवा उडवीची उत्तर देत होते. काही शेतकऱ्यांना या लोकांनी चेक दिले. मात्र, ते चेक बाउंन्स निघाले.
'उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार'
या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्याकडेही या कंपनीबाबत तक्रार केली आहे. तसेच, जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत. तोपर्यंत अटक केलेल्या व्यक्तींना जामीन मिळू नये, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, अशा घटनेत आणखी काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.