नाशिक - मुंंबई नाका परिसरातील भारतनगर येथे मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) अचानकपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर करत असताना गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत घरात राहणारे सहा जण भाजले होते. त्यापैकी चौघांचा शुक्रवारी (दि. 4 डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेने भारतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते
जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेत सहा जण भाजले होते. रशीद लतिक अन्सारी (वय 30 वर्षे), मोहम्मद अमजद अब्दूल रौफ अन्सारी (वय 30), मोहम्मद मुर्तजा अन्सारी (वय 30 वर्षे) व मोहम्मद अफताफ आलम (वय 19 वर्षे, रा. सर्व रूम नं.4 भारतनगर) अशी मृतांची नावे आहेत. भारतनगर येथे मंगळवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. परिसरातील नागरीक आणि पोलिसांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तब्बल चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरीत दोघांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.