नाशिक -कोरोनाची साखळी तुटावी या करिता शहरात आजपासून 11 मे पर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोक्याची शक्यता : छगन भुजबळ
चार दिवस जनता कर्फ्यू..
शहरासह व ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून ती साखळी तोडण्या करीता येवला शहरात आजपासून 11 मे पर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील दवाखाने, मेडिकल, दूध विक्री सुरू राहणार असून भाजीपाला, किराणा दुकान, फळे व इतर व्यवसाय बंद असणार आहे.
जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने कोरोनाची साखळी तुटावी या करीता नगर परिषदेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यू संदर्भात बैठक झाली होती. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी असोसिएशन, मेडिकल, भाजीपाला, फळे व इतर संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत शहरात 11 मे पर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता. शहरात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
हेही वाचा -नाशकात कोरोना उपाययोजनांवर पालकमंत्री भुजबळ व भाजप आमदारामध्ये खडाजंगी