महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्या चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या - Panchawati police station

भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करत एका युवकाला टोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पेठ रोडवरील शनि मंदिर परिसरात घडली होती. याप्रकरणी अवघ्या चोवीस तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत

आरोपी अटकेत
आरोपी अटकेत

By

Published : Apr 30, 2021, 9:16 PM IST

नाशिक - कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवसायासाठी महिन्याला 50 हजार रुपयांची खंडणी मागत व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्या चौघा संशयितांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांत बेड्या ठोकल्या आहेत

भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करत एका युवकाला टोळक्याने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पेठ रोडवरील शनि मंदिर परिसरात घडली होती. याप्रकरणी संदीप सुधाकर पगारे, (वय 33, रा. शनि मंदिराजवळ, पेठरोड) याच्या फिर्यादीवरून संशयितांवर शुक्रवारी पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

येवल्यातून केली अटक

याप्रकरणी गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने तपास करत 24 तासाच्या आत मुख्य संशयित विशाल भालेराव यास इनोव्हा कारसह (क्र. एम एच 44 बी 1131) येवला येथून ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांची माहिती दिली आहे. त्यानुसार गौरव अशोक सोनावणे, शुभम मधुकर खरात, सिध्दार्थ संजय बागूल यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली आहे. सहायक पोलीस निरीक्षक डंबाळे हे पुढील तपास करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details