नाशिक - मनमाड शहरातील 2 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. यात एक 60 वर्षीय पुरुष आणि मालेगाव येथे कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलिसाचा समावेश आहे. याआधी चार रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आज पुन्हा 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे कळताच नागरिकांच्या चिंतेत भर पडली.
मनमाडकरांच्या चिंतेत भर; शहरातील कोरोनाबधितांची संख्या वाढली - प्रशासन
नव्या कोरोनाबाधितांमध्ये मालेगाव येथे कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलिसाचा समावेश आहे. मालेगाव रोडवरील एका व्यक्तीला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर ते उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून ६ झाली आहे.
शहरातील मालेगाव रोडवरील एका व्यक्तीला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर ते उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेले. यावेळी त्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसून आल्यामुळे त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर मालेगाव येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 झाली आहे. नागरिकांनी आता तरी सावधानता बाळगावी, असे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे.
मालेगाव येथे कर्तव्य बजावत असलेल्या शहरातील 14 पोलिसांना मनमाड शहरात क्वारंन्टाईन करण्यात आले. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता पुन्हा त्या 13 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता या 2 रुग्णांमुळे शहरातील रुग्ण संख्या 6 झाली असून नागरिकांनी आता विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. आता शहरातील एकूण 3 ठिकाण कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.