नाशिक -दाम दुप्पट योजनेच्या नावाखाली चक्क लष्करी अधिकाऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. शहरातील गांधीनगर भागातील आर्टिलरी सेंटरमध्ये कर्नल पदावर काम करत असलेल्या चार ते पाच लष्करी अधिकाऱ्यांची तब्बल ४७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नाशिकरोड परिसरातील फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन या कंपनीने महिन्याला आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली आहे.
नाशिकमध्ये दामदुप्पटच्या नावाने लष्करी अधिकाऱ्यांना ४७ लाखांचा गंडा हेही वाचा -लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीनिमित्त मनमाडमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन
या प्रकरणी आधीच अटक असलेल्या दोन संचालकांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात लष्करी अधिकाऱ्यांसोबत इतरही अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून नागरिकांना या कंपनीबाबत तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा -नैसर्गिक आपत्तीतूनही वाचवली द्राक्षे; बागलाणच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
संशयित आरोपी अरविंद सिंग आणि राजेश सिंग यांनी नाशिकरोड भागात फ्युचर ट्रेडिंग सोलुशन ही कंपनी सुरू करून गुंतवणुकीवर महिन्याला आकर्षक व्याज देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली आहे. दिलेल्या वेळेत पैसे परत मिळत नसल्याने या लष्करी अधिकार्यांनी थेट उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा -दिंडोरी तालुक्यातील ओझे गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
काही वर्षात दामदुप्पट आणि आकर्षक परतवा या नावाखाली नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना ताज्या असताना आता चक्क लष्कराच्या अधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी आपल्या पैशाची गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.