महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेल्फी घेताना माजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा दरीत कोसळून मृत्यू - माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी

महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी आणि त्यांचे काही मित्र इगतपुरी तालुक्यात असलेल्या मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. एक उंच कठड्यावर उभे राहून सेल्फी घेत असताना ते २५० फूट दरीत कोसळले. यात त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी गवळी यांचा मृतदेह जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या पथकाला सापडला.

former ranji cricketer shekhar gawli passes away after falling into a gorge
सेल्फी घेताना माजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा दरीत कोसळून मृत्यू

By

Published : Sep 2, 2020, 4:04 PM IST

Updated : Sep 2, 2020, 4:48 PM IST

नाशिक -महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा मृतदेह आज (बुधवार) सकाळी सापडला आहे. मंगळवारी इगतपूरी तालुक्यातील मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेलेले शेखर गवळी सेल्फी घेत असताना अचानक दरीत कोसळले होते. आज सकाळपासून शोध कार्याला सुरूवात करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या पथकाला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांचा मृतदेह मिळाला. ही घटना काल (मंगळवार) संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अंधार असल्याने व दरीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्थानिक प्रशासनाने शोधकार्य थांबवले होते. त्यानंतर आज (बुधवार) सकाळी पुन्हा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली होती.

शोधकार्यादरम्यानची दृश्य....

शेखर गवळी आणि त्यांचे काही मित्र इगतपुरी तालुक्यात असलेल्या मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. एक उंच कठड्यावर उभे राहून सेल्फी घेत असताना ते २५० फूट खोल दरीत कोसळले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण शोध लागला नाही. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणेने शेखर गवळी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मंगळवारी संध्याकाळपर्यंत शोध लागला नव्हता. आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.

शेखर गवळी हे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती. तसेच महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाला त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. याशिवाय त्यांनी योग शिक्षक म्हणून देखील चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या अचानक जाण्याने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

सुरेश रैनासोबत शेखर गवळी....
शेखर गवळी यांच्या निधनावर मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'माजी रणजीपटू शेखर गवळी यांचे ट्रेकिंग दरम्यान इगतपुरी येथे पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची बातमी समजली. अत्यंत दु:ख झालं. शेखर गवळी उत्तम प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय गवळी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.'हेही वाचा -फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत नाशिकच्या विदितच्या नेतृत्वात भारताला पहिलं सुवर्णपदक; कौतुकाचा वर्षाव

हेही वाचा -कोरोना इफेक्ट: येवल्यातील पैठणी व्यवसायाला कोट्यवधींचा फटका

Last Updated : Sep 2, 2020, 4:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details