माजी आमदार मौलाना मुफ्तींसह २० नगरसेवकांनी दिली राष्ट्रवादीला सोडचिट्ठी - २० नगरसेवक
तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर नाराज होऊन, माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी वीस नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. २० नगरसेवकांसह, माजी महापौर हाजी नॅशनलवाले आदी समर्थकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी वीस नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली
नाशिक -लोकसभा व राज्यसभेत तिहेरी तलाक कायदा मंजूर झाला आहे. राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीचे खासदार असूनही ते चर्चेप्रसंगी गैरहजर राहिले. राष्ट्रवादीच्या खासदारांनी कोणत्याच प्रकारे विधेयकाला विरोध दर्शवला नाही. त्यामुळे तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर नाराज होऊन, माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी वीस नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली.