नाशिक- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा व सेनेने उमेदवार यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत जिल्ह्यातील तिन्ही विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली. मात्र प्रमुख दावेदार बाळासाहेब सानप यांना भाजपकडून वेटींगवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्याएवजी मध्य मतदारसंघात आमदार फरांदे यांना पक्षांतर्गत विरोध असूनही उमेदवारी मिळाली. त्यामुळे या मतदारसंघातील प्रमुख नेते व माजी आमदार बाळासाहेब सानप बंडखोरी करणार का, याची उत्सुकता वाढली आहे.
नाशिकच्या तिन्ही आमदारांना उमेदवारी, मात्र भाजपच्या सानप याना ठेवले गॅसवर...
विद्यमान आमदार बाळासाहेब सनप हे नाशिक पूर्व मतदारसंघातील प्रमुख दावेदार होते. मात्र, पक्षातील नेते, नगरसेवक व इच्छुकांच्या विरोधामुळे पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काल भाजपने आपली उमेदवारी यादी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील डॉ. राहुल आहेर (चांदवड), सीमा हिरे (नाशिक पश्चिम) देवयानी फरांदे (नाशिक मध्य) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र विद्यमान आमदार बाळासाहेब सनप हे नाशिक पूर्व मतदारसंघातील प्रमुख दावेदार होते. मात्र, पक्षातील नेते, नगरसेवक व इच्छुकांच्या विरोधामुळे पहिल्या यादीत त्याचे नाव आले नाही. त्यामुळे या मतदारसंघात महापालिका स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय मनसेचे संभाव्य उमेदवार राहूल ढिकले यांच्या नावावर चर्चा होत आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा-भाविकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला, दोन महिला ताब्यात