महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात विहिरीत पडलेल्या मादी काळविटाला वनविभागाच्या मदतीने जीवदान - येवल्यात विहिरीत पडले काळवीट

येवला तालुक्यातील अंदरसुल गावात एका शेतातील विहीरीत पडलेल्या मादी काळविटाला वनविभागाने बाहेर काढून जीवदान दिले.

येवल्यात विहिरीत पडलेल्या मादी काळविटाला वनविभागाच्या मदतीने जीवदान
येवल्यात विहिरीत पडलेल्या मादी काळविटाला वनविभागाच्या मदतीने जीवदान

By

Published : May 21, 2020, 12:12 PM IST

नाशिक - येवला तालुक्याच्या अंदरसुल गावात एका शेतातील 55 फूट खोल विहिरीत पडलेल्या काळविटाला वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे.

येवला तालुक्यातील अंदरसुल येथील दिनेश पागिरे या शेतकऱ्याच्या विहिरीत मादी काळवीट पडले. ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्याने त्वरित वनविभागाला कळवले. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने वनरक्षक गोपाळ हरगावकर 55 फूट खोल विहिरीत उतरले व मादी काळविटला दोरीच्या सह्यायाने बांधून बाहेर काढून जीवदान दिले. विहिरीच्या बाहेर काढताच मादी काळवीट वनक्षेत्राकडे धूम ठोकून पळून गेले.

येवल्यात विहिरीत पडलेल्या मादी काळविटला जीवदान

एकूणच तालुक्यातील ममदापूर, राजापूर, रेंडाळे या भागात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असून हरणांचा कळप नेहमी अन्न पाण्यासाठी भटकंती करत असतात. यावेळी कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक हरणे जखमी होतात तर काही ठार होतात. काही हरणे व काळवीट हे पाण्याच्या शोधात विहिरीत पडून मृत्यूमुखी पडतात. मात्र, या काळविटला सुदैवाने स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने वनकर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्याने त्याला जीवदान मिळाले.

विहिरीतून बाहेर काढण्यात आलेले काळविट

ABOUT THE AUTHOR

...view details