नाशिक -नाशिकच्या रविवार कारंजा बाजारपेठेत वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. बाजारपेठेत तील तेली गल्लीमध्ये ( Teli Galli ) प्रसिद्ध दगडू तेली यांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या दुकानात नाशिक वन विभागाच्या पथकाने छाप टाकले. या दुकानातून मोठ्या प्रमाणात साळींदरचे काटे, घोरपडीचे लिंग, हातजोडे, बारशिंगा, चौसिंग सारख्या हरणांच्या शिंगाचे अवशेष आदी अवयव जप्त ( wild animal organs seal ) करण्यात आले. अचानक छापेमारी झाल्याने वनविभागाच्या या कारवाईने बाजारपेठेत खळबळ उडाली.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई - या प्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ( Filed case under Wildlife Act ) करण्यात आला आहे. नाशिकच्या रविवार कारंजा बाजारपेठेत वन्य जिवांचे अवयव विकले जात असल्याची वन विभाग पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने खात्री पटवल्यानंतर वनक्षेत्रपाल विवेक भदाणे ( Forest Ranger Vivek Bhadane ) यांच्या पथकाने सोमवारी संध्याकाळच्या सुमारास रविवार कारंजा बाजारपेठेतील सुखलाल चांदवडकर यांच्या दुकानात छापा टाकला.