महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात भक्षाच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत, वनविभागाने पाच तासाने केली सुटका - नाशिक वनविभाग बातमी

बिबट्या विहिरीबाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाचा वतीने दोर आणि पिंजऱ्याचा वापर करून अखेर पाच तासांनी बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे.

forest department rescued after five hours a leopard fell into a well in search of food at nashik
नाशकात भक्षाच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत

By

Published : Oct 31, 2020, 10:10 PM IST

नाशिक -जिल्ह्यातील पेठ परिसरातील कोटंबी एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. हा बिबट्या भक्षाचा शोधत असताना अनावधानाने विहिरीत पडला असून या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या रेस्क्यू पथकाच्या वतीने पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे.

नाशकात भक्षाच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत

नाशिक जिल्ह्यात सध्या बिबट्या आढळून येण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेल्या महिनाभरात पाच पेक्षा अधिक बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी सिन्नर, इगतपुरी परिसरात बिबट्याचा मृत्यू झाल्याचे देखील आढळून आले होते. असाच भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शनिवारी घडली. पेठ परिसरात असलेल्या कोटंबी या ठिकाणी शरद पांडुरंग भुसारे यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दरम्यान, याबाबत काही सतर्क ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या वतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेण्यात आली व बिबट्या बाहेर काढण्यात आले आहे.

हा बिबट्या विहिरीबाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाचा वतीने दोर आणि पिंजऱ्याचा वापर करून अखेर पाच तासांनी बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details