येवला (नाशिक) - सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा फटका वन्यप्राण्यांना बसताना दिसत आहे. अन्न पाण्यासाठी वन्यप्राण्यांवर भटकंती करण्याची वेळ येत आहे. ही बाब लक्षात घेऊन येवल्यातील अंकाई किल्ल्यावर वन विभागाने माकडांसाठी अन्न आणि पाण्याची सोय केली.
अंकाई किल्ल्यावर अन्न-पाण्याची व्यवस्था करत वन विभागाने शेकडो माकडांची भागवली भूक - Ankai Fort
अंकाई किल्ल्यावर शेकडो माकडे वास्तव्यास असून या किल्ल्यावर येणारे पर्यटक त्यांना अन्न-पाणी देत असतात. मात्र, लॉकडाऊन असल्या कारणामुळे किल्ल्यावर कोणीही पर्यटक येत नसल्यामुळे या माकडांवर उपासमारीची वेळ आली होती.
अंकाई किल्ल्यावर अन्न पाण्याची व्यवस्था करत वनविभागाने शेकडो माकडांची भागवली भूक
येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावर शेकडो माकडे वास्तव्यास असून या किल्ल्यावर येणारे पर्यटक त्यांना अन्न-पाणी देत असतात. मात्र,लॉकडाऊन असल्या कारणामुळे किल्ल्यावर कोणीही पर्यटक येत नसल्यामुळे या माकडांवर उपासमारीची वेळ आली होती. वन विभागाने या माकडांकरता अन्न व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देत एकप्रकारे माकडांची भूक भागवण्याचा प्रयत्न केला आहे.
Last Updated : Apr 19, 2020, 3:00 PM IST