नाशिक :जिल्ह्यात 62 हजार 982 हेक्टर 7 आर क्षेत्र हे द्राक्षाखाली आहे,यात चांदवड, दिंडोरी, नाशिक,निफाड या तालुक्यात द्राक्षाचे लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे, निर्यातक्षम द्राक्ष साठी ऑनलाईन पद्धतीने प्ट्रेसिब्लिटी नेटद्वारे द्राक्ष नोंदणीसाठी 2021- 22 मध्ये 44 हजार 600 शेतकऱ्यांचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले होते,प्रत्यक्षात 31 हजार 811 शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली आहे, म्हणजे निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे..
'या' देशात होते द्राक्षांची निर्यात :युरोपियन खंडातील जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम ,युके आणि डेन्मार्क हे द्राक्षाची आयात करणारे मुख्य देशात, युरोपो वगळता इतर खंडाचा विचार केला तर रशिया,कॅनडा ,तुर्की आणि चीन या देशातून द्राक्षांना मोठी मागणी असून येथेही मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची निर्यात झाली आहे
गारपीट नंतर देखील अधिक निर्यात कशी :नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचे अवकाळी पाऊस गारपीट मध्ये झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत अधिकची निर्यात झाली कशी असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांमधून उपस्थित केला जात आहे. एवढेच नव्हे तर निर्यातदारांनी लातूर, सोलापूर, सांगली भागातील द्राक्षे नाशिक जिल्ह्यातील कोल्ड स्टोरेजमध्ये आणून ठेवत इथून निर्यात केल्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची द्राक्षाचे घेतलेले गुणवत्तापूर्ण उत्पादन युरोप सह इतर देशांमध्ये द्राक्षांना राहिलेली चांगली मागणी या कारणामुळे निर्यात वृद्धी झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. युक्रेन युद्धाला विराम मिळाला असला असता तर कदाचित रशियामध्ये आणखी निर्यात वाढणे शक्य होते असे अधिकाऱ्यांनी सांगितल आहे.