नाशिक -हे कश्मीर नाही, तर नाशिक आहे, असं म्हणण्याची वेळ आली आहे. शहरावर सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत आहेत. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नियमित मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांपेक्षा अधिक प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत.
आज सकाळी नाशिक शहर धुक्यात गुडूप झाले होते. संपूर्ण शहरावर धुक्याची पांढरी चादर पसरली होती. या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सतत वातावरणात बदल जाणवत आहे. धुके आणि थंडीमुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.