महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 4, 2019, 12:35 PM IST

Updated : Sep 4, 2019, 3:12 PM IST

ETV Bharat / state

मालेगावात मुसळधार : नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात

पावसाबरोबरच गटारांतील पाणी रस्त्यावर आले होते. महापालिकेच्या उदासीनतेमुळेच नागरिकांची पावसात त्रेधातिरपीट उडाली. घरात 3 फुटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, तरुणांनी वेळीच मदत केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

नाल्याला आलेल्या पुराचे नागरिकांच्या घरात शिरले

नाशिक- मालेगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील वसाहतीच्या अनेक घरांत शिरले होते. जवळपास 3 फुटापर्यंत पाणी घरात शिरल्याचे पाहून नागरिकांची विशेषतः महिला व लहान मुलांमध्ये भीती पसरून त्यांची तारांबळ उडाली होती. काही तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य राबवत घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षितस्थळी नेले.

मालेगावात नाल्याला आलेल्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले.

हेही वाचा -ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर रामकुंडावर महिलांचा पवित्र स्नान सोहळा संपन्न

घरात 3 फुटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, तरुणांनी वेळीच मदत केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 20 हा महापौर रशीद शेख यांचा आहे. या भागातून वाहणाऱ्या नाल्याची नीट सफाई करण्यात आली नसल्याने पुराचे पाणी घरात शिरून आमचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच महापौरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

हेही वाचा -मुंबईनाका पोलिसांकडून ६ लाखांचा गुटखा जप्त

शहरातील योगायोग मंगल कार्यालय परिसर, ६० फुटीरोड, सोयगाव, आझाद नगर, पोलीस कवायत मैदान, हजार खोली, देवीचा मळा कॅम्प, सोमवार बाजार, अयोध्या नगर आदी परिसरात दोन ते तीन फुटापर्यंत पावसाचे पाणी साचले. तर गटारे स्वच्छ केली नसल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला. पावसाबरोबरच गटारांतील पाणी रस्त्यावर आले होते. महापालिकेच्या उदासीनतेमुळेच नागरिकांची पावसात त्रेधातिरपीट उडाली.

हेही वाचा -नाशिकमध्ये अवैध शस्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

Last Updated : Sep 4, 2019, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details