नाशिक - गोदावरी नदीकाठावरील रामकुंडावर पुरसदृश्य परिस्थिती कायम आहे. त्यामुळे रामकुंडावर होणारे धार्मिक विधी आता रस्त्यावर करावे लागत आहेत. पावसाने सध्या काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मात्र अद्याप पूर ओसरला नसल्याने येथील रामकुंड आणि लक्ष्मण कुंड पाण्याखाली आहेत.
गोदावरी नदीच्या पूरामुळे रामकुंडावरील धार्मिक विधी रस्त्यावर - लक्ष्मण कुंड
आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे रामकुंड परिसरात पाणीच पाणी झाले आहे. दशक्रिया विधीच्या कुंडासह, अस्ती विसर्जन स्थळ आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे धार्मिक विधीसाठी येणार्या भाविकांना रस्त्यावर विधी करण्याची वेळ आली आहे.

नाशिकचा रामकुंड परिसर नेहमीच पर्यटकांबरोबरच धार्मिक विधी करणार्यांनी गजबजलेला असतो. मात्र आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे रामकुंड परिसरात पाणीच पाणी झाले आहे. दशक्रिया विधीच्या कुंडासह, अस्ती विसर्जन स्थळ आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे धार्मिक विधीसाठी येणार्या भाविकांना रस्त्यावर विधी करण्याची वेळ आली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी गंगापूर धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू आहे. तसेच शहरातही पाऊस पडत आहे. त्यामुळे आठवडाभरापासून रामकुंड आणि लक्ष्मण कुंड पाण्याखालीच आहे. असे असले तरी गंगेवर होणाऱ्या पूजा या विहित असल्याने त्या नियमितपणे सुरू आहेत.