नाशिक- जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला या मोसमातील पहिला पूर आल्याचे पाहायला मिळाले. गोदावरी नदीच्या या पुरामुळे शहरातील नदी काठचे रामकुंड, लक्ष्मणकुंड पाण्याखाली गेले आहेत. तसेच गांधी तलावही ओसंडून वाहू लागला आहे.
नाशकात गोदावरीला पूर; राम-लक्ष्मण कुंड पाण्याखाली, गांधी तलाव ओव्हर फ्लो - नाशकात मुसळधार पाऊस
गेल्या २ दिवसा पासून शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागते आहेत. हे सर्व पाणी गोदावरी पात्रात येऊन मिसळत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, लॉकडाऊन काळात निर्मळ झालेली गोदावरी नाल्यातील पाणी नदीत मिसळून प्रदूषित झाल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या २ दिवसापासून शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागते आहेत. हे सर्व पाणी गोदावरी पात्रात येऊन मिसळत असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, लॉकडाऊन काळात निर्मळ झालेली गोदावरी नाल्यातील पाणी नदीत मिसळून प्रदूषित झाल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
थोडा जरी पाऊस आला तरी शहरातील गटारी आणि सांडपाण्याच्या चेंबरमधील पाणी थेट नदीला येते आणि नदीला पूर येतो. मात्र, हे घाण पाणी नदीपात्रात थेटच येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प याप्रश्नी प्रशासनानास वारंवार सुचना देऊन गोदावरी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महापालिकेचा हा गलथान कारभार असल्याचा आरोप गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केला आहे.