महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या शिवसैनिकांना अटक, उद्या करणार न्यायालयात हजर

भाजप कार्यालयावर दगडफेक करणारे नगरसेवक दीपक दातीर यांसह पाच जण पोलिसांना शरण आले आहेत. त्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून उद्या त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत.

अटकेनंतरचे छायाचित्र
अटकेनंतरचे छायाचित्र

By

Published : Aug 28, 2021, 9:07 PM IST

नाशिक- भाजप कार्यालयावर दगडफेक करणारे नगरसेवक दीपक दातीर यासंह पाच जण पोलिसांना शरण आले आहेत. त्यांना रविवारी (दि. 29 ऑगस्ट) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या शिवसैनिकांना अटक

शिवसैनिकांना पाेलिसांकडे हजर व्हा, न्याय मिळेल - खासदार राऊत

भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी फरार असलेले शिवसेनेचे नगरसेवक दिपक दातीर व शिवसेना पदाधिकारी बाळा दराडे हे पोलिसांना शरण आले आहे. त्यांना घेऊनच खासदार राऊत नाशकात आल्याची चर्चा रंगली हाेती. दोघे संशयित हजर झाल्यानंतर त्यांच्यासोबत माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, सुनिल बागुल, गटनेते विलास शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित हाेते. दरम्यान, या शिवसैनिकांना पाेलिसांत हजर व्हा, असे मी सांगितले होते. कायदा सर्वांनाच सारखा आहे. त्यामुळे या शिवसैनिकांना पाेलिसांकडे हजर व्हा, न्याय मिळेल, असे शिवसेनेचे नेते खासदार सजय राऊत यांनी सांगितले आहे.

उद्या अटक सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार

भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित नगरसेवक दीपक निवृत्ती दातीर, नितीन चंद्रभान सामोरे, योगेश रामकृष्ण चुंबळे, योगेश उर्फ बाळा नामदेव दराडे, किशोर बालाजी साळवे यांना अटक करण्यात आली असून रविवारी (दि. 29 ऑगस्ट) सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली आहे.

हेही वाचा -परराज्यातून आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव कोसळले, रस्त्यावर लाल चिखल

ABOUT THE AUTHOR

...view details