महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 8, 2020, 4:42 PM IST

ETV Bharat / state

नाशिकमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक; एक फरार

नाशिक शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

nashik
नाशिकमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक

नाशिक- शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या ५ संशयित दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. तसेच एक आरोपी फरार झाला आहे. जेल रोड परिसरातील बिटको भागात गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ऋषिकेश निकम, सागर म्हस्के, संजय बुचडे, अनिकेत राजू जॉन आणि सिद्धार्थ सचिन धनेश्वर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा -पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू; मनमाड येथील घटना

शुक्रवारी मध्यरात्री नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी जेल रोड परिसरातील इंगळे मळा येथे गस्तीवर होते. यावेळी जेल रोडहून बिटको पॉईंटकडे पाच जण संशयास्पदरित्या पुढे जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान पोलिसांना बघून या संशयितांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडून झडती घेतली असता त्यांच्याकडून लोखंडी रॉड, मिरची पूड आणि इतर साहित्य आढळून आले. हे दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

नाशिकमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक

या पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details