नाशिक- देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. दिवसेंदिवस या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात आता नागपुरच्या येवल्यात आणखी 5 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.
येवल्यात आढळले पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण, सर्व पॉझिटिव्ह महिलेचे कुटुंबीय - येवल्यात आढळले पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण
येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता सहावर पोहोचली आहे. नव्याने आढळलेले सर्व रुग्ण हे आधीच पॉझिटीव्ह आलेल्या महिलेच्या कुटुंबातील आहेत. मालेगाव पाठोपाठ आता येवल्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.
येवल्यात आढळले पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण
मालेगाव कनेक्शन आलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबातील 9 जणांना तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यातील 9 जणांपैकी 5 जणांचे अहवाल हे रात्री पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील असून त्यांच्यावर नाशिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मालेगाव पाठोपाठ आता येवल्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.
Last Updated : Apr 27, 2020, 8:17 AM IST