नाशिक - येथील वणी मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी मुळाणे बारी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर उलटून अल्टो कारवर पडल्याने पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर, १० ते १५ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Car And Tractor Accident In Nashik ) आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Nashik Accident : नाशिकात ट्रॅक्टर आणि कारमध्ये भीषण अपघात; पाच ठार, अनेक जखमी - नाशिकमध्ये अपघातात पाच ठार
नाशिकमधील मुळाणे बारी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर उलटून अल्टो कारवर पडल्याने पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर, १० ते १५ जण गंभीर जखमी झाले ( Car And Tractor Accident In Nashik ) आहे.
Nashik Accident
मुळाणे घाटात अपघात -वणी कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात ट्रॅक्टर ट्रॉलीवरील नियंत्रण सुटल्याने एका अल्टो कारवर उलटली. त्यामध्ये कार आणि ट्रॅक्टर ट्रॉलीतील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 ते 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही महिला आणि बालकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस तसेच ग्रामस्थांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.