महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक शहरातील पहिल्या कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्यावर गुलाब पुष्पांची उधळण - nashik police covid 19 positive

नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना जनसेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

nashik police
नाशिक शहरातील पहिल्या कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्यावर गुलाब पुष्पांची उधळण

By

Published : Jun 12, 2020, 1:32 PM IST

नाशिक - शहरातील पहिल्या कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्यावर फुलांची उधळण करण्यात आली. भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचाऱ्याने कोरोनावर यशस्वी मात केली. कोरोनामुक्त झाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोरोनाची लागण झालेले ते पहिले पोलीस कर्मचारी होते.

मालेगाव पाठोपाठ नाशिक शहर आणि ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना जनसेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सहाय्यक आयुक्त मगलसिंग सूर्यवंशी, भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी त्या कोरोनामुक्त कर्मचाऱ्याने सर्वांचे आभार मानत कोरोना आजाराला घाबरून न जाता खबरदारी घेतल्यास कोरोनावर आपण मात करू शकतो. माझ्या पाठीशी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि परिवाराने खंबीरपणे उभे होते. त्यामुळे मी लवकर बरा झालो असल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details