नाशिक -जिल्ह्यातील मालेगावचे माजी नगरसेवक रिझवान खान यांच्या निवासस्थानी अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली. यामध्ये तब्बल ७ गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मालेगावात माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार, तब्बल ७ गोळ्या झाडल्या - मालेगाव माजी नगरसेवक घर गोळीबार
मालेगावातील मध्यवर्ती भागातील महेश नगर येथे रिझवान खान यांचे घर आहे. हल्लेखोरांनी बुधवारी सुरक्षा भिंतीवरून बंगल्याच्या चारही बाजूंनी ७ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी घरातील फ्रिजमध्ये घुसली आहे. तसेच घराच्या चारही बाजूंच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी खान यांच्या कारची देखील पाहणी केल्याचेही आढळून आले आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील महेश नगर येथे रिझवान खान यांचे घर आहे. हल्लेखोरांनी बुधवारी सुरक्षा भिंतीवरून बंगल्याच्या चारही बाजूंनी ७ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी घरातील फ्रिजमध्ये घुसली आहे. तसेच घराच्या चारही बाजूंच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी खान यांच्या कारची देखील पाहणी केल्याचेही आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रिझवान खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आहेत.