महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यातील परदेशपुरा भागात आग; तीन घरे जळून खाक - परदेशपुरा आग न्यूज

येवल्यातील गजबजलेल्या परदेशपुरा भागात आग लागली. या आगीत तीन घरांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दु

Fire
आग

By

Published : Mar 12, 2021, 10:35 AM IST

नाशिक -येवल्यातील परदेशपुरा भागात आग लागून तीन घरे जळून खाक झाल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुपारी साडे चारच्या सुमारास ही आग लागली. अचानक आग लागल्याने एकच धांदल उडाली.

येवल्यातील परदेशपुरा भागात आग

गजबजलेल्या परिसरात आगीमुळे धुराचे प्रचंड लोट निघत असल्याने नागरिकांनी धावाधाव सुरू केली. आगीने रौद्र रुप धारण केल्याने अग्निशामक दलाल पाचारण करण्यात आले. आगीत तीन घरांतील सर्व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. तिन्ही कुटुंबीयांच्या अंगावरील कपडेच केवळ शिल्लक राहिले आहेत. मुश्ताक शेख, आलीम शेख, रज्जाक शेख असे या पीडितांची नावे आहेत. शासनाने व शहरातील सधन नागरिकांनी या कुटुंबांची मदत करावी, असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details