मालेगाव (नाशिक)-मालेगाव शहरात सुत गोदामांना गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत कापडाच्या साठ्यासह गोदाम जळून भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता शहरातील महेशनगर भागातील भवानी ट्रान्सपोर्ट तसेच पवन ट्रान्सपोर्टच्या कापड गोदामांना भीषण आग लागली. कापडाने पेट घेतल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. या घटनेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मालेगावातील सूत गोदामला भीषण आग; आगीत दोन गोदामे जळून खाक
आग लागली त्या ठिकाणाच्या शेजारीच मालेगाव मनपाचे अग्निशामक दल आहे. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार बंब आग आटोक्यात आणण्यासाठी जलतगतीने दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते.
आग लागली त्या ठिकाणाच्या शेजारीच मालेगाव मनपाचे अग्निशामक दल आहे. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार बंब आग आटोक्यात आणण्यासाठी जलतगतीने दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात गेल्या काही दिवसापासून संचारबंदी लागू केली असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यात ही आग लागल्याने दुष्काळात तेरावा महिना आला, असे म्हणण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.